शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 19:41 IST

चांदणी चौकात  एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती...

पिंपरी: भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे शुक्रवारी (दि. २४) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (वय ४४, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), सीताबाई हरी चव्हाण (वय ५४, रा. तळोजा), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

तर मनोहर हरी चव्हाण (वय २६), राजा हरी चव्हाण (वय ३५), शिवाजी मारुती खडतरे (वय ३०) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. गोपाळ भीमला चव्हाण (वय ४५, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आयशर गाडी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौकात  एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक आणि क्लिनर टायर बदलत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आयशर गाडीने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेचा क्लिनर आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आयशर गाडी चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी