शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

येरवड्यातील म्हाडा वसाहतींमध्ये घडू शकते दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:25 PM

येरवड्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून येथील ११० इमारतींपैकी ८० टक्के इमारती धोकादायक अवस्थेत आहेत.

ठळक मुद्दे पालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गंभीर घटना घडण्याचा इशाराम्हाडा वसाहतींच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट वारंवार पाठपुरावा करुनही म्हाडाकडून कोणतीही उपाययोजना नाही

पुणे : शहरामध्ये सीमाभिंती कोसळल्याने २१ कामगारांचा बळी गेलेला असून धोकादायक वाड्यांची पडझडही सुरुच आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना येरवड्यातील म्हाडा वसाहतीमध्ये घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून येथील ११० इमारतींपैकी ८० टक्के इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. गेल्या वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेऊन त्याचा अहवाल म्हाडाला कळविण्यात आल्यानंतरही त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी म्हाडाच्या जुन्या इमारती ऊन वारा पावसाला तोंड देत उभ्या आहेत.

नुकतीच पालिकेकडून मनपा वसाहतींचीसुद्धा पाहणी करण्यात आली असून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याबाबत हालचाली करण्यात आल्या होत्या. येरवड्यामध्ये म्हाडाकडून १९८० साली अल्प उत्पन्न गटातील तसेच मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ११० इमारतींचे बांधकाम केले. या इमारतींमध्ये हजारो नागरिक सध्या राहात आहेत. यातील बहुतांश इमारती राहण्यालायक नसल्याचे चित्र आहे. पालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गंभीर घटना घडण्याचा इशारा देतानाच या इमारती राहण्यालायक नसल्याचे म्हाडाला कळविले होते. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतींना भेट देऊन पाहणी केली होती. या पथकानेही त्यावेळी इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे मान्य केले होते. परंतू अद्याप या अहवालावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासकीय उदासिनतेचे आणखी एक उदाहरण याठिकाणी पहायला मिळत असून दुर्घटना घडल्यानंतरच म्हाडा याकडे लक्ष देणार का असा सवाल उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे.=====महापालिकेने २०१८ साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काही गोष्टी प्रामुख्याने नमूद केल्या आहेत. इमारतींच्या भिंती लोड बेअरींगमध्ये तयार करण्यात आलेल्या असून त्यासाठी वापरण्यात आलेले लोखंड कमकुवत झाले आहे. इमारतींच्या पायाचे दगड निसटू लागले असून भिंतींना भेगा पडू लागल्या आहेत. चुना आणि गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या भिंतींची क्षमताही कमी झाली असून त्यांना इमारतीचा भार पेलवेनासा झाला आहे.
बहुतांश इमारतींच्या छताला गळती लागली असून चिनीमातीच्या ड्रेनेज लाईन्स आहेत. या ड्रेनेजला घुशी व उंदरांनी पोखरले आहे. ====म्हाडा वसाहतींच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्यावतीने या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आले होते. त्यावेळी म्हाडाच्या पथकानेही याठिकाणी पाहणी केली होती. इमारती धोकादायक अवस्थेत असून कोणतीही दुर्घटना घडू शकते. वारंवार पाठपुरावा करुनही म्हाडाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. नागरिकांचा बळी गेल्यावरच अधिकारी जागे होणार आहेत असा प्रश्न आहे.- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर====

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघात