शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Bike Accident : महिलेच्या अंगावरून ट्रकच चाक गेलं,जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:17 IST

गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिले च्या अंगावरून ट्रक चे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला

बिबवेवाडी :  भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हि घटना मार्केट यार्ड मधील गंगाधाम चौकात आज (१ १ जून ) बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली सोनी वय २९ असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून दुचाकीस्वार जगदीश पन्नालाल सोनी वय ६१ वर्ष असं जखमीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत अली पापालाल कुलकुंडी (वय 51 राहणार भवानी पेठ ) यास ताब्यात घेतले असून त्याची  वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड गंगाधाम या अत्यंत रहदारीच्या मार्गावरुन जगदीश आणि दीपाली  दोघेजण दुचाकीवरून जात होते. गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार पन्नालाल हे गंभीर जखमी झाले आहेत.  जखमी पन्नालालला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.दरम्यान, गंगाधाम चौकात कायम अपघात होत असतात. अपघात झाला की तात्पुरती जड वाहनांना बंदी घालण्यात येते. गंगाधाम चौकाकडे जाणाऱ्या बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर पायाभूत सुविधांची वानवा आहे. महापालिकेने 'आई माता मंदिर' आणि गंगाधाम चौक दरम्यानच्या उतारात बदल करण्याची योजना जाहीर केली आहे. हा उतार कमी करून स्पीड बंप आणि रॅम्बल स्ट्रिप्स बसवले जात आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविली गेली पाहिजेत. या रस्त्यावर दिवसा जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी  स्थानिक रहिवासी अतुल जैन व अमोल परदेशी यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिस