शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की घातपात?

By admin | Updated: July 17, 2014 03:24 IST

निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला

पिंपरी : ‘निकिताचा मृत्यू अपघात नसून, हा घातपाताचा प्रकार आहे. मुलीला मारणाऱ्यांना ताब्यात घ्या, अटक करा,’ असा टाहो निकिताची आई सीता निसर्गंध यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोडला. त्यामुळे निकिताचा मृत्यू अपघात की घातपात आहे याचा छडा लावणे, या घटनेची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. ‘गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही’ अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निगडीतील भक्ती-शक्ती चौक - भोसरी स्पाइन रस्त्यावर चिखलीत महापालिकेचा स्वस्तातील घरकुल हा गृहप्रकल्प आहे. घरकुल सहकारी गृहरचना संस्थेतील कुलस्वामिनी इमारत (३१, सी २३) आहे. त्यातील पाचव्या मजल्यावर ५०३ क्रमांकाची सदनिका सीता निसर्गंध यांची आहे. पतीचे निधन झाले असल्याने ३ मुली आणि २ मुलांसह त्या येथे वास्तव्यास आहेत. धुणी-भांडी करण्याचे काम करीत असल्याने घराबाहेर पडल्या होत्या. निकिताची भावंडेही शाळेत गेली होती. ती घरात एकटीच होती. भंगारवाल्यामुळे घटना उघड प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुलस्वामिनी इमारतीत सकाळी पावणेअकराच्या सुमारास एक भंगारवाला आला. त्याला पार्किंगमध्ये एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याने याबाबतची माहिती इतर सदनिकाधारकांना दिली. त्यानंतर संजय ओव्हाळ, जनार्दन उबाळे, श्रीरंग कोळेकर, अजित गायकवाड यांनी धाव घेऊन निकिताला रिक्षातून जवळच्या रुग्णालयात नेले, तर काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेला. दरम्यान, याच कालखंडात दोन संशयित व्यक्ती येथे सापडल्याने त्यांनाही नागरिकांनी चोप दिला. गौतम गायकवाड म्हणाले, ‘‘निकिता ही माझ्या भाचीची मुलगी आहे. घटनास्थळ पाहता तिने उडी मारलेली दिसत नाही. तिला कोणीतरी ढकलून दिले आहे. तिचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचाच प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. याचा तपास करण्याची गरज आहे.’’ नातेवाइकांनी तिच्या आईची समजूत काढल्यानंतर सायंकाळी सहानंतर निकिताचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. संरक्षक कठडे बसवावेत जेथून निकिता पडली. तेथील भिंत अडीच फूट उंचीची आहे. त्यावर संरक्षक कठडे बसविलेले नाहीत. येथे संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)