'रिंगरोड'साठी २५ गावातील नियोजित जमीन मोजणी प्रक्रियेला गती द्या : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:16 PM2021-05-24T19:16:35+5:302021-05-24T19:17:42+5:30

रिंगरोड (पूर्व) मार्गासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर या ५ तालुक्यातील ४६ गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना दिनांक १९ मे २०२१ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Accelerate the process of land survey in 25 villages for 'Ring Road': District Collector Dr. Rajesh Deshmukh | 'रिंगरोड'साठी २५ गावातील नियोजित जमीन मोजणी प्रक्रियेला गती द्या : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

'रिंगरोड'साठी २५ गावातील नियोजित जमीन मोजणी प्रक्रियेला गती द्या : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या रिंगरोडसाठी २५ गावांमध्ये जमिनी भूसंपादित करण्यात येत आहे. यामध्ये मावळ, मुळशी, हवेली, दौंड-पुरंदर, भोर, खेड या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या गावांमधील जमीन धारकांच्या अडी-अडचणींचे समाधान करुन मोजणी प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रिंगरोड महामार्गाच्या बांधकामाच्या भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत मोजणीबाबतची आढावा बैठक  झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, उपविभागीय अधिकारी मावळ, मुळशी, हवेली, दौंड-पुरंदर, भोर, खेड, संबंधित तालुक्यांचे उपअधिक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व अभियंता, मोनार्चचे अधिकारी उपस्थित होते. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

रिंगरोडने बाधीत होणाऱ्या गावांमध्ये जाऊन महसूल प्रशासनाने जमीन धारकांच्या सर्व शंकाचे व अडी अडचणींचे निरसन केल्यामुळे मोजणीसाठी विरोध कमी होऊन आत्तापर्यंत ३७ गावांपैकी १२ गावातील १६० हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत मुळशी तालुक्यातील घोटावडे, मातेरेवाडी, अंबडवट, कासार-आंबोली, कातवडी (६ गावे), हवेली तालुक्यातील मालखेड, मांडवी बुद्रुक, वरदाडे, घेरा-सिंहगड, मोरदाडवाडी (५ गावे) व भोर तालुक्यातील मौजे- कुसगाव अशा एकूण १२ गावांची भूसंपादनाची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

रिंगरोड (पूर्व) मार्गासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर या ५ तालुक्यातील ४६ गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना दिनांक १९ मे २०२१ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांना दिल्या.

Web Title: Accelerate the process of land survey in 25 villages for 'Ring Road': District Collector Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.