अत्याचार केला अन् लग्नाला नाही म्हणाला! हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:30 IST2024-01-08T10:25:26+5:302024-01-08T10:30:02+5:30
लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे....

अत्याचार केला अन् लग्नाला नाही म्हणाला! हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : एका ऑनलाइन विवाह नाेदणीच्या संकेतस्थळावरून दाेघांची ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुंढवा येथील पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित संजय कदम (२९, रा. कामोठे, नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मांजरी, मुंढवा येथे ऑगस्ट २०२३ ते ३ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी युवतीने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. त्यातून रोहित कदम याच्याशी त्यांची ओळख झाली. कदम याने त्यांच्या मुंढव्यातील घरी घेऊन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.