शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! पुण्यात शिक्षकाचे १२ अल्पवयीन विद्यार्थिंनींसोबत गैरवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 18:28 IST

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. 

पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित व्यक्ती लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. या व्यक्तीने शिक्षक असल्याचा गैरफायदा घेऊन १२ अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. शाळेतील मधल्या सुट्टीतील वेळात मुलींना जवळ बोलावून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. इतकेच नव्हे तर घडला प्रकाराविषयी कुठेही वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकावण्यातही आले. अखेर विद्यार्थींनी या प्रकाराची पालकांना कल्पना दिल्यावर त्यांनी शाळा प्रशासनकडे तक्रार केली. त्यावर गटविकास आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यात तथ्य आढळल्यावर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थिनींच्या सांगण्यानुसारअनेक महिने हा प्रकार शाळेत सुरु होता. मग ही बाब इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. 

या विषयी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुराडे म्हणाले की, 'जिल्हा प्रशासनाने या प्रकारणाची गंभीर दखल घेतली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल' .

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकLohgaonलोहगावStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी