लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक
By नम्रता फडणीस | Updated: March 7, 2024 16:41 IST2024-03-07T16:41:01+5:302024-03-07T16:41:21+5:30
तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक
पुणे: मला तू खूप आवडतेस, असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. यश विजय चांदणे (वय २०, बोपोडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
एका २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. दि. २० ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी त्या भागात नवीन राहण्यास आली होती. आरोपीने तिच्या घराचे दार व खिडकी वाजवून तिला विनाकारण त्रास दिला. ती घराबाहेर आल्यानंतर आरोपीने तिच्याकडे एकटक बघून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरात घुसून तिच्याशी लगट करून तिच्या तोंडावर हात ठेवून ओरडलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासमवेत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळे पुढील तपास करीत आहेत.