अल्पवयीन मुलीवर अत्याचार; इन्स्टाग्रामवर व्हिडिओही केला व्हायरल, पुण्यातील धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 13:17 IST2021-09-26T04:12:16+5:302021-09-26T13:17:49+5:30
कळस : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीला महाविद्यालयातून दुचाकीवर जबरदस्तीने बसवून माळशिरस येथे लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; इन्स्टाग्रामवर व्हिडिओही केला व्हायरल, पुण्यातील धक्कादायक घटना
कळस : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीला महाविद्यालयातून दुचाकीवर जबरदस्तीने बसवून माळशिरस येथे लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीने लग्नास नकार दिला म्हणून आरोपीने धमकी देत अल्पवयीन मुलीचा इन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
अविनाश रामा शिंदे, (फुलेनगर, माळशिरस) असे आरोपीचे नाव आहे. अंथुर्णेत अल्पवयीन मुलगी जवळच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तेथूनच तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने दुचाकीवर नेऊन माळशिरस (ता. माळशिरस) येथील लॉजवर नेऊन तीन वेळा जबरदस्तीने आरोपीने शारीरिक संबंध केले.
अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली असता, त्यास पीडित मुलीने विरोध केला म्हणून आरोपीने तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने मी तुझे मोबाईलमधील व्हिडिओ व्हायरल करीन व आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर व्हिडिओ व्हायरल केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.