शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१ महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित; पुण्यातील शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 14:00 IST

रेल्वे, बसस्थानके, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल, खाणावळी, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणी शोध घेतला जाणार

पुणे : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित ३ ते १८ वयोगटातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी दि. ५ ते २० जुलै या कालावधीत सर्वेक्षण करून शाेध घेतला जाणार आहे.             जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय नाईकडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे. बी. गिरासे उपस्थित हाेते.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात शाळेत कधीच दाखल न झालेली बालके, शाळेत प्रवेश घेतलेली, परंतु प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेली १ महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने शाळेत अनुपस्थित राहत असलेली बालके आणि कुटुंबासोबत स्थलांतरित होऊन येणारी व जाणारी बालके यांचा शाेध घेतला जाणार आहे. या सर्वेक्षणात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास, कामगार आयुक्तालय, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृहविभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने शाेधमाेहीम राबविण्यात येणार आहे.

काेठे राबविणार शाेधमाेहीम?

रेल्वे, बसस्थानके, फुटपाथ, सिग्नल, हॉटेल, खाणावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्ट्या, दगडखाणी साखर कारखाने तसेच बालमजूर असण्याची शक्यता असलेली ठिकाणी जिल्हा, तालुका, केंद्र व गाव पातळीवर शाळाबाह्य मुलांचा शाेध घेतला जाणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच अंगणवाडीसेविका, मदतनीस, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणUnemploymentबेरोजगारीcultureसांस्कृतिक