Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 21:07 IST2023-01-10T21:07:14+5:302023-01-10T21:07:34+5:30

मराठी-हिंदी बिग बॉस गाजवणारा अभिजीत बिचुकले अपघातात जखमी झाला आहे.

Abhijit Bichukle : Big Boss fame Abhijit Bichukle accident in Pune, head injury | Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत

Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत


Abhijit Bichukle Accident : मराठी आणि त्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये झळकलेला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) याचा पुण्यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये बिचुकलेच्या डोक्याला दुखापत झाली असून, एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बिचुकलेला डॉक्टरांनी घरी विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने बिग बॉस गावजणाऱ्या अभिजित बिचुकलेचा पुण्यात अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी बिचुकलेसोबत त्याचे चार मित्रही होते, त्यांनाही दुखापत झाली आहे. दरम्यान, उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बिचुकले काही कामा निमित्त पुण्यात आला होता. 

अभिजीत बिचुकलेचा अपघात नेमका कसा झाला, आहे अद्याप समजू शकले नाही. सध्या तो पुण्यातील घरात आराम करत आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बिचुकलेने आपले नाव लोकप्रिय केले आहे. मनोरंजन विश्वापासून राजकारणापर्यंत बिचुकलेची चर्चा असते. सुरुवातीला मराठी आणि नंतर हिंदी बिग बॉसमधील सहभागामुळे तो चर्चेत आला. 

Web Title: Abhijit Bichukle : Big Boss fame Abhijit Bichukle accident in Pune, head injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.