शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

कठीण समय येता ‘अभय’ योजना कामास येते; पालिकेची अर्थव्यवस्था तरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 7:43 PM

अभय योजनेमधून तब्बल ४७७ कोटी २० लाखांच्या थकबाकीची वसुली...

ठळक मुद्देयंदाच्या २५ जानेवारीपर्यंत १ हजार ३८० कोटी रुपयांचे मिळाले उत्पन्न

पुणे : वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे राज्यातील सर्वच महापालिका आणि नगरपालिकांचे आर्थिक उत्पन्न घटलेले आहे. त्याचा परिणाम विकासकामांवरही झाला आहे. परंतु, या आर्थिक संकटाच्या काळातही पालिकेला ‘अभय योजने’ने तारले आहे. या योजनेमधून पालिकेला तब्बल ४७७ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मिळकत कर हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्याच्यावर खर्चाचा डोलारा उभा आहे. त्या खालोखाल उत्पन्न असलेल्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा मात्र घटले आहे. पालिकेला दरवर्षी मिळकतकरातून साधारण बाराशे कोटी रुपये उत्पन्न मिळते. यंदाच्या २५ जानेवारीपर्यंत १ हजार ३८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 

स्थायी समितीने निर्णय घेऊन १ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत अभय योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत थकीत मिळकतकरावरील दंडामध्ये ८० टक्के सूट देण्यात आली. या कालावधीत तब्बल १ लाख १४ हजार ६३१ थकबाकीदारांनी ३५१ कोटी १८ लाख रुपये मिळकतकर जमा केला. नागरिकांच्या मागणीनुसार, या योजनेला १० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीत थकबाकी भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली. स्थायी समितीने पुन्हा या योजनेस २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत दंडामध्ये ७० टक्के सवलत देण्यात आली. या कालावधीत ३४ हजार १७९ थकबाकीदारांनी १२६ कोटी १ लाख रुपये थकबाकी भरली. असे १ क्टोबर ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये १ लाख ४८ हजार ८१० मिळकतधारकांनी ४७७ कोटी २० कोटी रुपयांची थकबाकी भरली. ====कोरोना कालावधीत पुणेकरांनी पालिकेवर विश्वास दाखवत मोठ्याप्रमाणावर थकबाकी भरली आहे. मिळकतकर उत्पन्नाच्या बाबतीत पुणे महापालिका राज्यात आघाडीवर आहे. १ लाख ४८ हजार ८१० जणांनी ४७७ कोटी २० लाख रुपये थकबाकी भरली आहे. थकबाकीदारांनी नियमित कर भरणा करावा. मिळकतकर विभागाने चांगली कामगिरी केली आहे. पालिकेचे वार्षिक उत्पन्न साडेचार हजार कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे विकासकामांना गती मिळू शकेल. - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरcorona virusकोरोना वायरस बातम्या