बीडच्या सासरेबुवांकडून पुणेकर जावयाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 06:41 IST2023-09-10T06:41:20+5:302023-09-10T06:41:36+5:30

म्हणे, तुमची जमीन माझ्या मुलीच्या नावे करून द्या..!

Abduction of Punekar's son-in-law by Beed's in-laws | बीडच्या सासरेबुवांकडून पुणेकर जावयाचे अपहरण

बीडच्या सासरेबुवांकडून पुणेकर जावयाचे अपहरण

डलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जावयाने त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने चक्क जावयाचे अपहरण केले. पुण्यातून त्याला बळजबरीने चारचाकीत बसवत थेट बीडला नेले. तेथील एका गोठ्यात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड) यांनी आडे यांची पत्नी आर्तिका यांच्या नावावर जमीन करून द्यावी यासाठी आडे यांचे अपहरण केल्याचे म्हटले आहे.

Web Title: Abduction of Punekar's son-in-law by Beed's in-laws