Pune Crime | किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामुळे उंड्रीत टोळक्याकडून तरुणावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 11:00 IST2023-04-12T10:58:23+5:302023-04-12T11:00:02+5:30
ही घटना ९ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास उंड्रीत घडली...

Pune Crime | किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामुळे उंड्रीत टोळक्याकडून तरुणावर वार
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामुळे टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना ९ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास उंड्रीत घडली. सुफियान शाह असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रब्बार शेख (३०, रा. मोहंमदवाडी) याने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
रब्बार आणि सुफियान ९ एप्रिल रोजी उंड्री परिसरात थांबले होते. त्यावेळी चष्मा घालण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने सुफियान याला शिवीगाळ केली. त्यानंतर टोळक्याला बोलवून घेत त्यांनी सुफियानला बेदम मारहाण करत त्याच्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत.