Pune Crime| जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकावर कोयत्याने हल्ला; राजगुरूनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 13:55 IST2022-09-24T13:54:33+5:302022-09-24T13:55:01+5:30
खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे...

Pune Crime| जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकावर कोयत्याने हल्ला; राजगुरूनगर येथील घटना
राजगुरुनगर (पुणे) : जुन्या भांडणाच्या कारणावरून कोयत्याने वार केल्याची घटना राजगुरूनगर येथे घडली आहे. या हल्ल्यात गणेश नामदेव चव्हाण (वय 23 रा.चव्हाण मळा,पाबळरोड़ ता. खेड) हा युवक जखमी झाला आहे. याबाबत स्वराज प्रकाश कराळे, ओंकार उर्फ़ मोन्या भोगाड़े दोघे (रा भोसरी ता.हवेली ) व इतर दोन अनोळखी व्यक्तीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार (दि. २३) रोजी रात्री चव्हाण मळा, पाबळ रोड येथे फिर्यादी उभे असताना स्वराज कारले, ओंकार उर्फ़ मोन्या भोगाडे व इतर दोन व्यक्तींनी जुन्या किरकोळ भांडणाचे करणा वरुन स्वराज कराळे याने हातातील कोयता फिर्यादिस जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारला. हातावर, पाठीवर, कमरेवर मारुन जखमी केले व वरील सर्वांनी फिर्यादीचे चुलत भाऊ सागर सोपान चव्हाण यांना ही लाथा बुक्क्यांनी मारहाण करुण शिविगाळ केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करित आहे.