Pune: तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:57 IST2023-11-06T09:57:11+5:302023-11-06T09:57:27+5:30

ही घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे....

A young woman was hit in the eye, hit under the ear when she asked for a reply; Filed a case | Pune: तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल

Pune: तरुणीला डोळा मारला, जाब विचारल्यावर मारली कानाखाली; गुन्हा दाखल

पुणे : गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. याचा जाब विचारला असता, आरोपीने पीडित तरुणीला मारहाण केली. ही घटना बोपोडी येथील एका पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी खडकीपोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चिखलवाडी, बोपोडी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने खडकीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौतम राजू कदम (पत्ता माहीत नाही) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बोपोडी येथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी पंपावर रांग असल्याने ती रांगेत उभी होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने संबंधित मुलीकडे पाहून डोळा मारला. तसेच अश्लील हावभाव केले. याचा जाब तरुणीने आरोपीकडे विचारला असता, त्याने तरुणीला कानशिलात लगावत मारहाण केली. तसेच अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

Web Title: A young woman was hit in the eye, hit under the ear when she asked for a reply; Filed a case