Pune Crime : मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:03 IST2022-10-15T16:02:55+5:302022-10-15T16:03:14+5:30
ही घटना मंगळवार पेठेतील सदाआनंदनगर परिसरात घडली....

Pune Crime : मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल
पुणे : तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवार पेठेतील सदाआनंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी पवन करताल, दीपक परदेशी, फैजल (तिघेही रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा नाेंदवला आहे.
याबाबत मयूर बाळासाहेब चव्हाण (वय ३२, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण आणि आरोपी करताल, परदेशी, फैजल यांच्यात वाद झाले होते. चव्हाण आणि त्याचा मित्र विनोद जाधव सदाआनंदनगर परिसरात थांबले होते.
आरोपींनी चव्हाणचा मित्र अभिषेक पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली. चव्हाणने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केला. ताे वार हुकवत चव्हाण तेथून पळाला. त्या वेळी आरोपींनी अभिषेक याच्या पाठीत रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू फेकून मारला. आरोपींनी परिसरात दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.