हातात कोयता, कमरेला बनावट पिस्तूल लावून दहशत; तरुणाच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 18:20 IST2023-08-25T18:20:25+5:302023-08-25T18:20:49+5:30
२२ वर्षीय तरुणाला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे....

हातात कोयता, कमरेला बनावट पिस्तूल लावून दहशत; तरुणाच्या मुसक्या आवळल्या
नारायणगाव (पुणे) : वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात कोयता व कमरेला बनावट पिस्तूल लावून हातवारे करीत धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
नारायणगाव पोलिस स्टेशनचे हद्दीमधील वारुळवाडी येथील ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (दि.२३) रोजी रात्री ११ वाचे सुमारास पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला एक तरुण हा त्याचे हातातील कोयता व कमरेला पिस्तूल लावून रस्त्यावर उभे राहून हातवारे करून धाक दाखवून दहशत निर्माण असताना दिसल्याने पोलिसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव अनिल सुनील जाधव (रा. ठाकरवस्ती, वारुळवाडी,) असे असल्याचे निष्पन्न झाले.