शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेबचा स्टेटस ठेवणे पडले महागात; इंदापूरात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:46 IST

वफत ए हजरत औरंगजेब आलमगीर आर.ए.' असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता

इंदापूर -व्हॉटस अपच्या स्टेटसवर औरंगजेब याचा फोटो व मजकूर ठेवल्याच्या आरोपावरुन इंदापूर पोलीसांनी एक जणावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.अक्रम रशीद कुरेशी (रा.कुरेशीगल्ली,इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. भाजपचे शहराध्यक्ष किरण गानबोटे ( रा.अंबिकानगर, इंदापूर) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सविस्तर माहिती अशी की,आरोपी अक्रम कुरेशी याने दि.२ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औरंगजेब याचा फोटो व त्याखाली ३ मार्च वफत ए हजरत औरंगजेब आलमगीर आर.ए.' असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता. दि.३ मार्चला सकाळी व्हॉटसअपवरचे स्टेटस बघत असताना फिर्यादी किरण गानबोटे यांच्या नजरेस ही बाब आली.तो फोटो व मजकूर बघितल्यानंतर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातील याची जाणीव असताना व भारत देशात औरगंजेब याचे कोणते ही चांगले कार्य नसताना,त्याचे उदात्तीकरण व्हावे या उद्देशाने आरोपीने हे स्टेटस ठेवले आहे.ते पाहून हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल म्हणून, सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे हेतूने व्हॉटसअप स्टेटसला वरील पोस्ट प्रसारित केल्याच्या कारणावरुन गानबोटे यांनी आरोपीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख हवालदार प्रकाश माने, हवालदार सलमान खान यांनी आरोपीस ताब्यात घेतले.दरम्यान, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी शहरातील दर्गा मस्जिदी, व देवळांच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. फौजदार दत्तात्रय लेंडवे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप