शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

व्हाट्स अँपवर स्टेट्स ठेवला, गळा चिरला, बीडच्या तरुणानं संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:56 IST

तरुण आत्महत्या प्रयत्न करणार आहे, त्याने त्याच्या मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे सुसाईड नोट पाठवली असल्याचे घरच्यांनी कंट्रोल रूमला सांगितले होते

पुणे: पुण्यात एका वीस वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत थेट आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली. विद्यार्थ्याने चक्क सार्वजनिक शौचालयात आत्महत्या केली. हा विद्यार्थी मूळ बीडच्या भाग्यनगर परिसरात राहणारा होता. तो aims bhopal येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आणि फेस्टिव्हल गेम्ससाठी तो AFMC college पुण्यात आला होता. याच दरम्यान त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे त्याने WhatsApp status ठेवत हे केल्याने या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

तरुणाचे नाव उत्कर्ष महादेव शिंगणे असं आहे. तो वैद्यकीय शिक्षण भोपाळाला घेत होता.आत्महत्येपूर्वी त्याने व्हाट्स अँप स्टेट्सवर सुसाईड नोट ठेवली. आणि सार्वजनिक शौचालयात स्वतःचा गळा कापून जीवन संपवलं. ही घटना पुण्यातील वानवडी भागात आठ मे रोजी घडली असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

उत्कर्षचा शोध घेतला असता कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. तो कमोडवर बसलेले आढळून आला. शेजारीच रक्त आणि चाकू पडलेला होता. चाकू त्याने ऑनलाईन अँप वरून मागवलेला असल्याची माहिती आता समोर आली आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असून घटनास्थळी पोलीस अधिक तपास करतायेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करीत आहेत. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पंचनामा मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय होते सुसाईड नोटमध्ये

‘मी उत्कर्ष शिंगणे भोपाळमधील ‘एआयआयएमएस’ संस्थेत शिक्षण घेत आहे. अभ्यासाचा ताण, तसेच नैराश्यामुळे मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करत आहे. अभ्यासक्रमात मुघल, फ्रेंच, रशियन इतिहासाचा समावेश करू नये. त्याऐवजी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा समावेश करावा’, असे उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेBeedबीडCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPoliceपोलिसDeathमृत्यू