Pune: महिलेच्या तोंडात कापडी बोळा कोंबून धारदार हत्याराने वार

By नितीश गोवंडे | Updated: October 4, 2023 18:58 IST2023-10-04T18:56:32+5:302023-10-04T18:58:29+5:30

याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे...

A woman was stabbed with a cloth ball in her mouth pune latest news | Pune: महिलेच्या तोंडात कापडी बोळा कोंबून धारदार हत्याराने वार

Pune: महिलेच्या तोंडात कापडी बोळा कोंबून धारदार हत्याराने वार

पुणे : महिलेच्या तोंडात कापडी बोळा कोंबून मारहाण केल्याप्रकरणी एका इसमाविरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय महिला घरात एकटीच होती. यावेळी त्या राहत असलेल्या इमारतीच्या जीन्यातून एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने महिलेच्या तोंडात कापडी बोळा कोंबळा. हातातील धारदार हत्याराने महिलेच्या हातावर मारून पळ काढला.

त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी संबंधित महिला घरात असताना, दुसऱ्यांदा अनोळखी इसम घरात आला असता, त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देखील त्याने महिलेचे तोंड दाबले. त्यांना देवघरात घेऊन जात त्यांच्या हातातील बांगड्या फोडत त्यांना मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

Web Title: A woman was stabbed with a cloth ball in her mouth pune latest news