Pune: ‘तुला आता सरळ करतो’ म्हणत शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
By नितीश गोवंडे | Updated: June 28, 2024 19:24 IST2024-06-28T19:22:32+5:302024-06-28T19:24:02+5:30
हा प्रकार गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे येथे घडला आहे...

Pune: ‘तुला आता सरळ करतो’ म्हणत शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
पुणे : शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे येथे घडला आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आश्रु नामदेव खवळे (रा.राममनोहर लोहिया नगर, पुणे) याच्याविरोधात विनयभंगासह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी या शासकीय कार्यालयात काम करतात. गुरुवारी दुपारी फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मोठमोठ्याने बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात, तुला आता सरळ करतो, अशी धमकी दिली, तसेच अश्लील शिवीगाळ करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक धनवडे करत आहेत.