देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 16:17 IST2023-12-09T16:16:32+5:302023-12-09T16:17:45+5:30
अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
चिखली (पुणे) :देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्र्कने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलेला चिरडल्याची घटना घडली. वृषाली बाजीराव भालेकर (वय 35) यांना ट्रकने चौकात धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे.
या अपघातावेळी चौकात सिग्नल यंत्रणा बंद होती व आज एकादशी असल्याने वाहनांची गर्दी होती. परंतू वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कुणीही पोलीस कर्मचारी अपघातावेळी हजर नसल्याने ग्रामस्थ व स्थानिकांमधून संताप व्यक्त करत रस्त्यावरील वाहतूक आडवण्यात आली.
अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका येण्यासही विलंब झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे यांनी धाव घेतली परंतु त्यांना देखील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.