कल्याण-अहमदनगर महामार्गावर कार व मोटारसायकलची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:31 IST2024-05-30T13:30:51+5:302024-05-30T13:31:11+5:30
ही घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर वाडेकरवस्ती येथे घडली...

कल्याण-अहमदनगर महामार्गावर कार व मोटारसायकलची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
बेल्हा (पुणे) : कल्याण-अहमदनगर महामार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढत चालले असून, वाहनचालकांनी वेगावर नियत्रंण ठेवण्याची गरज आहे. बेल्हा परिसरात इग्लू डेअरीसमोर कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्यावर मागून आलेल्या दुसऱ्या कारखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) सायंकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर वाडेकरवस्ती येथे घडली. या अपघातात पांडुरंग नंदाराम भांबेरे (रा. गुळूंचवाडी) यांचा जागेवरच मृत्यू झाला.
बेल्हा गावाच्या दिशेने पांडुरंग भांबेरे हे त्यांच्या मोटारसायकलीवरून (एमएच १२, बीव्ही ६९) जात होते. आळेफाट्याकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या कारची (एमएच १४, एफएक्स ३९९८) त्यांच्या दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेने हवेत उडालेले भांबेरे हे मागून आलेल्या दुसऱ्या कारखाली (एमएच १६, डीबी ९०९९) सापडून जागीच ठार झाले. तपास बेल्हा औट पोस्टचे विकास गोसावी हे करीत आहेत.