Pune: पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारची एसटी बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 15:02 IST2023-07-10T15:00:39+5:302023-07-10T15:02:20+5:30
एसटी बस स्वारगेटकडून मुंबईच्या दिशेने जात होती...

Pune: पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारची एसटी बसला धडक
पिंपरी : स्वारगेटकडून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसला निगडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर परमार कॉम्प्लेक्सजवळ अपघात झाला. या प्रकरणी कार चालक देवानंद भाऊराव कल्लोरे (वय ३०) याच्यावर देहू रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस स्वारगेटकडून मुंबईच्या दिशेने जात होती. पुणे मुंबई महामार्गावर परमार कॉम्प्लेक्सजवळ पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारी कार डिव्हायडरला धडकली. नंतर ती कार एसटीच्या पुढच्या बाजूला येऊन धडकली. यात एसटी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच कारचा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी एसटी चालक देवराम रामकिसन यंचेवाड (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कार चालक देवानंद भाऊराव कल्लोरे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.