शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:15 IST

अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट

पुणे : अडीच ते तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी येथील सीएएफव्हीडी मैदानाजवळ अनोळखी मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीच्या गळ्यावर बोटांचे ठसे आढळून आले. पोलिसांनी मुलीला ससून रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अज्ञाताविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार या रस्त्याच्या दक्षिणेला असलेल्या सीएएफव्हीडी मैदानावरील चिकुच्या झाडाजवळ तीन वर्षाची मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून खडकी पोलिसांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून खडकी पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'घटना घडली ते ठिकाण निर्जन असून तेथे लोकांचा अजिबात वावर नसतो. एक रिक्षाचालक तेथून जात असताना झाडाजवळ त्यांना एक मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तीन वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसले. तिला ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून केरून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मुलीची ओळख पटविण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना माहिती पाठविण्यात आली आहे तसेच समाजमाध्यमाद्वारे माहिती प्रसारित करण्यात आली आहे. तीन वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रार कोणत्या पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे का, या आधारे तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू