शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक परप्रांतीय, तो प्रतिभा काकींना ओळखत नव्हता; टेक्स्टटाईल पार्कच्या व्यवस्थापकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:10 IST

प्रतिभा काकी येण्याची पूर्वकल्पना असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो, तसद्दी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो

बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून माध्यमांना व्हिडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर बारामती टेक्स्टटाईल पार्क चे  व्यवस्थापक अनिल वाघ यांनी या घटनेबाबत खुलासा केला आहे. 

वाघ म्हणाले, टेक्स्टईल पार्कचे हे प्रवेशद्वार मुळातच फक्त मालवाहतुकीसाठी आहे. येथून येणाऱ्या गाड्या मालवाहतुकीचे असतात. पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी दुसरे गेट उपलब्ध आहे. त्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक परप्रांतीय आहे. तो प्रतिभा काकी यांना ओळखत नव्हता. मात्र याबाबत मला समजल्या नंतर त्यांना तेथून पार्क मध्ये  सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर प्रतिभाकाकी पार्कमध्ये आल्या. त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जाऊन महिलांशी संवाद साधला. तसेच खासदार सुप्रिया ताई सुळे, युगेंद्र पवार देखील नुकतेच पार्क मध्ये येऊन गेले आहेत. यापूर्वी प्रतिभाकाकी आणि रेवतीताई पार्क मध्ये येऊन गेल्या आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच केले आहे. आज त्या येण्याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. ती असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो. त्यांना काही तसद्दी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो,असे स्पष्टीकरण बारामती टेक्स्टटाईल पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिले आहे.

नेमकं काय घडलं? 

बारामती टेक्स्टटाईलच्या समोरचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांच्याकडून आला होता. व्हिडीओमध्ये सिक्युरिटीने प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांची कार आल्यावर प्रवेशद्वार बंद केले. पार्कच्या सीईओंच्या सांगण्यावरून प्रवेशद्वार बंद केल्याचे सुरक्षारक्षक यामध्ये सांगत आहे. तसेच प्रतिभा पवार यांच्या भगिनी गीता जाधव यांनी या सुरक्षारक्षकाला प्रवेशद्वार उघडण्याबाबत सूचित केले. आमची गाडी पाहून पार्कचे प्रवेशद्वार बंद केले. आम्ही काय चोरी करायला आलेलो नाही, आम्हाला शाॅपिंग करायची असल्याचे सांगताना गीता जाधव दिसतात. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी शुक्रवारी (दि. १५) या पार्कला भेट देऊन येथील महिला कामगारांशी संवाद साधला होता. 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-acबारामतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवार