Pune Crime| लग्नाच्या आमिषाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 13:05 IST2022-09-14T13:05:01+5:302022-09-14T13:05:30+5:30
पुणे : लग्नाच्या आमिषाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केलेल्या रिक्षाचालकास वाकड पोलिसांनी अटक केली. विकास ...

Pune Crime| लग्नाच्या आमिषाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास अटक
पुणे : लग्नाच्या आमिषाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती केलेल्या रिक्षाचालकास वाकड पोलिसांनी अटक केली.
विकास सतीश गायकवाड (वय ३०), असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी, पीडितेच्या ४२ वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ डिसेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.
गायकवाड हा रिक्षाचालक असून, तो विवाहित आहे. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध करून तिला ८ महिन्यांची गरोदर केले आहे. त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी (पोटेन्सी टेस्ट) करून डीएनए सॅम्पल घ्यायचे आहे. याखेरीज, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.