Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:38 PM2023-07-10T20:38:01+5:302023-07-10T20:38:33+5:30

सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात...

A pistol-wielding innkeeper was shot dead on Wednesday pune latest crime news | Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या

Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या

googlenewsNext

पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने बुधवार पेठेत पकडले. त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

ओंकार रामप्रकाश अंभुरे (वय २१, रा. साक्षी अपार्टमेंट, गारमाळ, धायरी) असे त्याचे नाव आहे. अंभुरे सराईत गुन्हेगार आहे. अंभुरे बुधवार पेठेत थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अमोल पवार, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: A pistol-wielding innkeeper was shot dead on Wednesday pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.