Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 20:38 IST2023-07-10T20:38:01+5:302023-07-10T20:38:33+5:30
सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात...

Pune: पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बुधवार पेठेत आवळल्या मुसक्या
पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने बुधवार पेठेत पकडले. त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.
ओंकार रामप्रकाश अंभुरे (वय २१, रा. साक्षी अपार्टमेंट, गारमाळ, धायरी) असे त्याचे नाव आहे. अंभुरे सराईत गुन्हेगार आहे. अंभुरे बुधवार पेठेत थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अमोल पवार, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.