शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 19:54 IST

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही

बारामती : बारामती शहरातील मार्केटयार्ड रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. बुधवारी(दि ९) सायंकाळी हा प्रकार घडला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

सायंकाळी सहाच्या सुमारास मार्केटयार्डच्या मागील प्रवेशद्वारापासुन काही अंतरावर हि चारचाकी गाडीने पेट घेतला .रस्त्यावरून जाताना कारने अचानक पेट घेतल्याने कारमध्ये असणारे चालक प्रसंगावधान राखून बाजूला गाडी घेत उतरले. शिवाय गाडीत इतर कोणी नसल्याने कोणतीही जीवीतहानी झालेली नाहि. मात्र, आग लागलेली पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने नगरपरीषदेचे अग्नीशामक दलाचे वाहन वेळीच पोहचले. या वाहनाने आग वेळीच आटोक्यात आणली. मात्र, कारचे आगीत मोठे नुकसान झाले आहे.

या कारचे चालक वालचंदनगर(ता.  इंदापुर)येथील असुन त्यांचे नाव दत्तात्रय जाधव असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. पोलीसांकडे देखील सायंकाळी उशीरा जाधव या प्रकरणी माहिती देण्यासाठी पोहचले होते. जाधव हे त्यांच्या कारमधुन बारामती येथील खासगी बालरुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या लहान मुलाला वालचंदनगर येथे नेण्यासाठी आले होते. दवाखान्याजवळ येतानाच कारने पेट घेतला. हिच घटना रुग्णालयातून लहान मुल आणि अन्य नातेवाईक घेऊन जाताना घडला असती ,तर मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. मात्र, सुदैवाने वेळेआधीच आग लागल्याने पुढील अनर्थ टळल्याचे दत्तात्रय जाधव यांनी सांगितले. बारामतीत भिगवण चौकातून या भागात येतानाच गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे जाणवले.त्यामुळे त्याच परीस्थितीत गाडी बाजुला घेताना अचानक कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखुन मी बाहेर पडलो. स्थानिकांनी मदत केली. तसेच अग्नीशामक दलाला कळवले. सुदैवाने वेळेआधीच आग लागली आणि त्यातून मी बाहेर प डल्याने पुढील अनर्थ टळला. नशीब बलवत्तर म्हणुन बचावल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेfireआगcarकारWaterपाणीFire Brigadeअग्निशमन दल