'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: December 30, 2023 15:35 IST2023-12-30T15:33:58+5:302023-12-30T15:35:30+5:30
यावेळी शिगवी यांना बोलण्यात गुंतवून आरोपीने शिगवी यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढायला लावली....

'पाचशेची नवीन नोट देवाला द्यायचीय...' म्हणत एक लाखाला गंडा; येरवडा परिसरातील घटना
पुणे : ५०० रुपयांची नवीन नोट द्या, देवाला द्यायची आहे, असे म्हणत एका दुकानदाराचा १ लाखांचा ऐवज घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी विजयकुमार दलीचंद शिगवी (रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार शिगवी यांचे सपना प्रोव्हिजन स्टोअर नावाचे दुकान आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास एक ४० वर्षीय (अंदाजे) इसम त्यांच्या दुकानावर आला. त्याने शिगवी यांच्याकडे ५०० रुपयाची नवीन नोट द्या, देवाला द्यायची आहे असे सांगितले.
यावेळी शिगवी यांना बोलण्यात गुंतवून आरोपीने शिगवी यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढायला लावली. ती चैन ५०० रुपयाच्या नोटेमध्ये ठवत दुकानातील पैशांच्या ड्रॉव्हरला लावून देण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन, ड्रॉव्हरमधील रोख असा १ लाखाचा ऐवज घेऊन पसार झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दर्शना शेलार या करत आहेत.