Pune Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बाब! पुण्यातून 'या' पाच मार्गांवरील विमानसेवा वाढणार

By नितीश गोवंडे | Published: June 15, 2023 11:36 AM2023-06-15T11:36:34+5:302023-06-15T11:36:44+5:30

रद्द होणाऱ्या उड्डाणांचे प्रमाण कमी होऊन प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्यात मदत होणार

A matter of joy for travelers! Airline services will increase on these five routes from Pune | Pune Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बाब! पुण्यातून 'या' पाच मार्गांवरील विमानसेवा वाढणार

Pune Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बाब! पुण्यातून 'या' पाच मार्गांवरील विमानसेवा वाढणार

googlenewsNext

पुणे : लोहगाव (पुणे) विमानतळावरून जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. पुण्यातून नागपूरसह अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होणार आहे. दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबाद आणि बंगळुरू या पाच मार्गांवर विमानसेवा वाढवण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीने घेतला आहे. यामुळे अनेकदा पुणे विमानतळावरून अन्य विमान कंपन्यांच्या उशीराने तसेच रद्द होणाऱ्या उड्डाणांचे प्रमाण कमी होईल, आणि प्रवाशांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्यात मदत होणार आहे.

विमानाचा मार्ग आणि वेळ (निघणार आणि पोहोचणार)

१) पुणे ते दिल्ली - संध्याकाळी ०५:३० - ०७:३५
- दिल्ली ते पुणे - सकाळी १०:५५ - दुुुपारी ०१:१० (शनिवार सोडून)

२) पुणे ते दिल्ली - रात्री ११:२० - मध्यरात्री ०१:२५)
- दिल्ली ते पुणे - रात्री ०८:३० - रात्री १०:३५

३) पुणे ते नागपूर - दुुपारी ०१:५० - दुपारी ०३:१५
- नागपूर ते पुणे - दुपारी ०३:४५ - संध्याकाळी ०४:५५ (शनिवार सोडून)

४) पुणे ते जोधपूर - दुुपारी १२:५० - दुुपारी ०५:५५ (बुधवार आणि शनिवार सोडून)
- जोधपूर ते पुणे - दुपारी ०३:३० - संध्याकाळी ०५:१५ (बुधवार आणि शनिवार सोडून)

५) पुणे ते अहमदाबाद - संध्याकाळी ०५:५० - रात्री ०७:००
- अहमदाबाद ते पुणे - सकाळी १०:३० - सकाळी ११:५०

६) पुणे ते बंगळुरू - रात्री ०८:४० - रात्री १०:१० (शनिवार आणि सोडून सोडून)
- बंगळुरू ते पुणे - संध्याकाळी ०६:३५ - रात्री ०८:०० (शनिवार आणि रविवार सोडून)

Web Title: A matter of joy for travelers! Airline services will increase on these five routes from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.