बारामती| भरदिवसा घरे फोडणाऱ्या अट्टल घरफोडी करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:15 IST2022-02-16T20:14:24+5:302022-02-16T20:15:14+5:30
पोलिसांनी ताबा वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत अटक केली...

बारामती| भरदिवसा घरे फोडणाऱ्या अट्टल घरफोडी करणाऱ्याला अटक
बारामती (पुणे): भरदिवसा बंद घरे हेरुन घरे फोडणाऱ्या अट्टल घरफोड्याला बारामती पोलिसांनी अटक केली. लोकेश रावसाहेब सुतार (वय २८, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे या घरफोड्याचे नाव आहे. सध्या तो कोल्हापूरमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी ताबा वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत अटक केली.
शहरात घडलेल्या गुन्ह्याच्या पद्धतींचा तपास करण्यात आला. त्यानुसार शेजारील जिल्ह्यात माहिती घेतली असता लोकेश सुतार हा कळंबा कारागृहातील आरोपीने अशा पद्धतीचे गुन्हे केल्याचे दिसून आले. पोलिसांनी वॉरंटच्या आधारे त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला असता त्याने साथीदार पाटील याच्या मदतीने बारामतीत भर दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सात लाख २० हजार रुपये किमतीचे सुमारे १८ तोळे सोन्याचे दागिने गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले आहेत.संदीप यशवंत पाटील (रा. लिंगनूर) या साथीदाराच्या मदतीने तो घरफोड्या करत होता. त्याच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरामध्ये बंद घरे फोडून लूट करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सपोनि प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक सागर ढाकणे, अंमलदार अभिजित कांबळे, संजय जाधव, संजय जगदाळे, रामचंद्र शिंदे, कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, अंकुश दळवी, रणजित देवकर, दशरथ इंगोले, अजित राऊत आदींचे तपास पथक तयार करण्यात आले होते.