शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 09:20 IST

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बारामती :बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या लढतीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंंबीय बुधवारी (दि. २०) बारामती, काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, बारामती विधानसभेसाठी सुमारे पावणेचार लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.बारामती विधानसभा मतदारसंघात बुधवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहोचले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.अधिक माहिती देताना नावडकर म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या ३ लाख ७५ हजार ७१२ आहे. त्यापैकी १ लाख ९० हजार ८४१ पुरुष मतदार, १ लाख ८४ हजार २९० महिला मतदार, २१ इतर मतदार आहेत. बारामती मतदारसंघांमध्ये एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी ३९ टेबलची व्यवस्था करून ३२६ बॅलेट युनिट, ४६३ कंट्रोल युनिट, ५०१ व्हीव्हीपॅट यंत्राचे औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या गोडाऊन येथून केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदारसंघात ३८६ मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ९४३ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांना नेण्यासाठी एकूण ४७ एस.टी. बसेस, १५ खासगी मिनी बसेस, ९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती करिता ४० क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानापर्यंत बारामती व इंदापूर तालुक्यात १४३४ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. बारामती, इंदापूर तालुक्यातील एकूण बंदोबस्त पोलिस अंमलदार- ७८०, होमगार्डस् ५६९, सीमा सुरक्षा बल ८५ आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली.१९३ मतदान केंद्रबारामती मतदारसंघांमध्ये १९३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मतदानप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये ३० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी, ३८६ पोलिस कर्मचारी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स १ प्लाटून, आरपीएफ हरयाणाचे २ प्लाटून मिळून ७० जवान नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मॉडेल मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र जळोची येथील सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह, माळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत दिव्यांग मतदान केंद्र, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात २३ उमेदवार आहेत. यामध्ये १५ अपक्षांचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेbaramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदान