शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:05 IST

गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळील डोमेवाडी परिसरात मंगळवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमनाथ मंदिरामागील शेतकरी ज्ञानेश्वर ढोमसे यांच्या शेतात मजुरीसाठी आलेले गोरख पुनाजी शेळकंदे (वय २९, रा. वालहिवरे) हे सकाळच्या सुमारास आपल्या कामादरम्यान शेताच्या कडेला लघुशंकेसाठी गेले असता ही घटना घडली.      मिळालेल्या माहितीनुसार, गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. अनपेक्षितरीत्या झालेल्या या प्रसंगाने शेळके काही क्षणांनी सावरले आणि मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केला. आरडाओरड ऐकताच शेतातील इतर मजूर व स्थानिक नागरिक तत्काळ त्या दिशेने धावले. मानवी हालचाली व गोंधळ पाहून बिबट्याने तेथून पळ काढला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला.     घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने जखमी गोरख शेळके यांना बाहेर काढून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले असून सुदैवाने गंभीर दुखापत टळली असल्याची माहिती मिळते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने त्या परिसराला तत्काळ भेट देऊन पाहणी केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या भागात वन्यप्राण्यांची हालचाल वाढलेली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच, बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks farm worker in Junnar; villagers rush to rescue.

Web Summary : In Junnar, a leopard attacked a farm worker. Villagers rushed to the scene upon hearing his cries, causing the leopard to flee. The injured worker received treatment; forest officials are setting a trap.
टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याJunnarजुन्नरforest departmentवनविभागFarmerशेतकरीenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग