अवसरी: पोंदेवाडी फाटा ते मंचर (ता.आंबेगाव ) या रस्त्यावर वैद्यवाडी फाट्या जवळच बुधवार (दि.१८) रोजी सकाळी सात वाजण्याचा सुमारास हुंडाई कंपनीची सेंड्रो कार रस्यावरील विद्यूत खांबाचा अंदाज न आल्याने जोरात धडकल्याची घटना घडली असून या अपघातातकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार मधील एक जखमी झाला आहे.
या संदर्भात समजलेली माहिती अशी कि, मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथून कारने तीघे जण वैद्यवाडी फाटा मार्गे अवसरी खुर्द येथील इंजिनेअरींग कॉलेजला जात होते. या रस्त्यालगत तापकीर वस्ती नजदिक ३३ केव्हीचा विद्यूत खांब आहे. या खाबांचा अंदाज न आल्याने कार विद्यूत खाबांला धडकली व ३३ केव्हीची विद्यूत तार तुटली पण तार वरच्या वर अडकली. अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग उघडल्याने मोठी हानी टळली. या अपघातात कारमधील एक जण जखमी झाल्याने त्याला पारगाव या ठिकाणी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. कारमध्ये वाल्मीक गवळी व अविष्कार मावळ व अन्य एक जण प्रवास करत होते.
Web Summary : Near Vaidyawadi, a car collided with an electric pole, injuring one occupant. The accident occurred when the driver misjudged the pole's position. An airbag deployment prevented more serious injuries. The injured person was taken to a hospital in Pargaon.
Web Summary : वैद्यवाड़ी के पास एक कार बिजली के खंभे से टकरा गई, जिससे एक व्यक्ति घायल हो गया। दुर्घटना तब हुई जब चालक ने खंभे की स्थिति का गलत अनुमान लगाया। एयरबैग खुलने से गंभीर चोटें टल गईं। घायल व्यक्ति को पारगांव के एक अस्पताल में ले जाया गया।