Pune: एअर व्हॉल्व फुटल्याने लष्कर परिसरात तयार झाला कारंजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:39 IST2022-09-16T13:36:55+5:302022-09-16T13:39:21+5:30
त्काळ या व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम सुरू...

Pune: एअर व्हॉल्व फुटल्याने लष्कर परिसरात तयार झाला कारंजा
लष्कर (पुणे): आज पहाटे ५.३० वाजता लष्कर पाणीपुरवठा केंद्रासमोर असलेल्या सेंट मेरी चर्च समोरील पाण्याच्या हाय सर्व्हिस पंपिंग लाईनचा एअर व्हॉल्व अचानक फुटला. यामुळे इथं ३० फूट उंच पाण्याचा कारंजा तयार झाल्याचे पाहायला मिळाले. याविषयी माहिती मिळताच लष्कर पाणीपुरवठा विभागाने तत्काळ या व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.
याबाबत लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रंगनाथ तस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट मेरी चर्च समोरील वानवडी हाय सर्व्हिस पंपिंग लाईन गेली आहे. त्या लाईनमधील अंतर्गत तांत्रिक बिघाडामुळे एअर व्हॉल्व तुटला आणि त्यामुळे मोठ्या दाब निर्माण झाल्याने ही लाईन फुटली. साधारणत दोन ते तीन इंच खड्डा झाल्याने आणि ही पंपिंग लाईन असल्याने पाणी अतिशय उंचावर उडताना दिसत होते.
याबाबतची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सदरचा एअर व्हॉल्व बदलण्याचे काम सुरू केले आहे. सकाळपासूनच सतत पडणाऱ्या पावसामुळे काम करण्यात अडथळा निर्माण झाला. पुढील अर्धा तासात सदरचा व्हॉल्व पूर्णपणे बदलून हाय सर्व्हिस लाईन दुरुस्त होईल.