Pune | उजनी पाणलोट क्षेत्रात सापडला तीस किलो वजनाचा मासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:26 IST2023-03-06T16:24:43+5:302023-03-06T16:26:12+5:30
उजनी धरणात सापडला ५ हजार ४०० रुपयांचा मासा...

Pune | उजनी पाणलोट क्षेत्रात सापडला तीस किलो वजनाचा मासा
इंदापूर (पुणे): उजनी पाणलोट क्षेत्रात मच्छिमारांच्या जाळ्यात आज ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला. प्रतिकिलो १८० रुपये प्रमाणे त्याला ५ हजार ४०० रुपये दर मिळाला.
गोपाळ रजपूत व कृष्णा राजपूत यांना हा मासा मिळाला होता. इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारातील तेजश्री फिश मार्केट या आडत दुकानाचे मालक दत्तात्रय व्यवहारे यांनी तो विकत घेतला. सिल्व्हर जातीतील एवढा मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे,असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.