क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:40 IST2023-09-27T12:40:11+5:302023-09-27T12:40:42+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती.

A doctor rapes a young woman after consuming alcohol in the clinic | क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

क्लिनिकमध्ये मद्य पाजून तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीला क्लिनिकमध्ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्कार केला. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नारायणपेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये घडला. शुभंकर महापुरे (२६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. कालांतराने त्यांची ओळख वाढत गेली. महापुरेने तिला स्वत:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले. तरुणी क्लिनिकला गेली असता, तिला मद्य देण्यात आले. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत शुभंकर महापुरेने बलात्कार केला.
 

Web Title: A doctor rapes a young woman after consuming alcohol in the clinic