शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद उफाळला; ४० वर्षीय वडिलांचा कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:40 IST

आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष (वडील) यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले

राजगुरूनगर: मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी आणि त्याच्या मित्राशी वाद उफाळुन आल्यावर वडिलावर कोयत्याने वार करण्यात आले . या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना कडूस, ता खेड  मंगळवारी दि ३)  रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

संतोष बबन ढमाले (वय ४०, रा. कडूस) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले दोघेही रा. कडूस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक झांबर गारगोटे (वय ५०, रा. कारामळी, ता. खेड ) आणि मयत संतोष ढमाले हे मित्र आहेत. ते एकत्र चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर पडले होते. त्याचवेळी बारच्या समोर उभे असलेले आरोपी किरण खंडागळे आणि प्रणय नवले यांच्याशी संतोष त्यांचा वाद झाला. यापूर्वी प्रणय नवले याने संतोष यांच्या मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. वादाचे पर्यावसान हिंसक हल्ल्यात झाले. दोन्ही आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. संतोष खाली पडल्यानंतर फिर्यादी अशोक घाबरून पळाले आणि नंतर संतोष यांच्या कुटुंबीयांना घेऊन घटनास्थळी परतले. तेव्हा संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.संतोष यांना तातडीने चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू