शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; इंदापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2023 09:19 IST

प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा

इंदापूर : किरकोळ कारणावरून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील सावतामाळीनगर मधील बावडा वेस नाक्याजवळ आज (दि.८) साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत इंदापूरपोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते.

किरण नामदेव शिंदे (वय २३ वर्षे, रा. बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात सुधीर किसन पारेकर (वय ३० वर्षे, रा. वनगळी, ता. इंदापूर), राजेश हरीदास शिंदे (वय ५४ वर्षे, रा. सावतामाळीनगर, इंदापूर) हे दोघे जण जखमी झाले आहेत. पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे, तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे.

यासंदर्भात पारेकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी की, पारेकर हे नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात. ते बावडा वेस नाक्यालगतच्या भागात डास निर्मूलनासाठी धुरळणीचे काम करून घेत होते. आरोपी किरण शिंदे याने त्यांच्याकडे जाऊन धुरळणी यंत्र मागितले. यंत्र गरम झाल्याने ते देण्यास पारेकर यांनी नकार दिल्याने आरोपीने चिडून त्यांच्या कपाळावर कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी यापूर्वी आपल्या वडिलांना केलेल्या शिवीगाळीचा राग धरून आरोपीने, त्यांच्या ही हातावर व दंडावर कोयत्याने वार केले. ही घटना समजल्यानंतर आरोपीस पकडण्यात आलेल्या पोलिसांबरोबर देखील आरोपीची बाचाबाची झाली, असे वृत्त आहे. पारेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndapurइंदापूरMONEYपैसा