Pune: काँग्रेस कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:25 IST2023-06-10T12:23:45+5:302023-06-10T12:25:28+5:30
दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Pune: काँग्रेस कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : विश्रांतवाडी येथे काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षाने आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ मे रोजी घडली होती. त्याप्रकरणी दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्रिता दास (वय ३५) आणि सुश्मिता दास (३३, रा. गोवा) असे पोलिसांनी दाखल केलेल्या दोघींची नावे आहेत.
याप्रकरणी मयत विकास टिंगरे यांचा मुलगा दुर्गेश विकास टिंगरे (२१) याने विमानतळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत, दास बहिणी त्याच्या वडिलांना वारंवार फोन करून गोवा येथे ऑनलाइन जुगार तसेच कॅसिनो जुगार खेळण्यासाठी बोलवत होत्या. जुगारात जिंकलेले पैसे त्यांना परत न देता त्यांची फसवणूक केली म्हणून विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली, असे म्हटले आहे. अद्याप पोलिसांनी दास भगिनींना अटक केली नसून, तसाप सुरू आहे.