Pune: शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:23 IST2024-03-18T17:22:48+5:302024-03-18T17:23:20+5:30
शिक्रापूर (पुणे) : येथील पुणे-नगर रस्त्यावर कारला कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना कार रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळून झालेल्या ...

Pune: शिक्रापूर येथे पुणे-नगर महामार्गावर झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू
शिक्रापूर (पुणे) : येथील पुणे-नगर रस्त्यावर कारला कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला वाचवताना कार रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळून झालेल्या अपघातात प्रीतेश प्रेमचंद संचेती या कारचालकाचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावरून प्रीतेश संचेती व बीडचे नगरसेवक अमोल नाईकवाडे हे दोघे त्यांच्या ताब्यातील दोन वेगवेगळ्या कारमधून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चालले होते. शिक्रापूरजवळ प्रीतेश संचेती यांच्या कारला अचानक कुत्रा आडवा आल्याने संचेती कुत्र्याला वाचवण्यासाठी कार बाजूला घेत असताना संचेती यांची कार (एमएच- २३, एडी- ४५६४) रस्त्याच्या कडेला असेलल्या झाडावर आदळली.
यावेळी कारचालक प्रीतेश संचेतीसह कारमधील अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. या अपघातात प्रीतेश प्रेमचंद संचेती (वय ३७, रा. विप्रनगर, ता. बीड) याचा जागीच मृत्यू झाला. तर नीरज मदनलाल अग्रवाल (३६, रा. विप्रनगर, ता. बीड) व मयूर प्रशांत लांडे (१६, रा. राजीव गांधी चौक, ता. बीड) हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत बीडचे नगरसेवक अमोल मारुतीराव नाईकवाडे (४३, रा. विप्रनगर, ता. बीड) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापू हाडगळे हे करीत आहेत.