नीरा बस स्थानकासमोर अंगावरून ट्रक गेल्याने जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 18:14 IST2023-10-21T18:13:45+5:302023-10-21T18:14:05+5:30

नीरा बस स्थानकासमोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू...

A 78-year-old senior citizen died after being run over by a truck in Neera | नीरा बस स्थानकासमोर अंगावरून ट्रक गेल्याने जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू 

नीरा बस स्थानकासमोर अंगावरून ट्रक गेल्याने जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू 

पुरंदर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज शनिवारी (२१ ऑक्टोबर) अडीचच्या सुमारास नीरा बस स्थानकासमोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृत्यू झाला आहे. दादासाहेब संतराम मारकड अस त्यांचे नाव असून ते जेजुरी येथील रहिवाशी आहेत.

याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकड हे चालत पुणे-पंढरपूर रस्त्याने नीरा बस स्थानकाकडे चालले चालले होते. ट्रकने (क्रमांक एम. एच. १२- इ.एफ.९१५७) त्यांना धडक बसली. त्यामुळे ते चाकाखाली गेले आणि त्यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

नीरा येथील पोलिस हवालदार संदीप मदने, निलेश जाधव आणि होमगार्ड बरडे व स्थानिक युवकांनी यावेळी मदत करून या व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. यासंदर्भात अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान ट्रक चालक ट्रकसह नीरा पोलीस चौकीत हजर झाला आहे.

Web Title: A 78-year-old senior citizen died after being run over by a truck in Neera