बारामती: २० वर्षीय युवतीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:19 IST2022-05-25T12:24:00+5:302022-05-26T15:19:37+5:30
कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीची आत्महत्या...

बारामती: २० वर्षीय युवतीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
उंडवडी कडेपठार (पुणे) : बारामती तालुक्यात नामांकित कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या एका २० वर्षीय युवतीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. शरयू संदिप रणवरे (वय. २० वर्षे, रा.वडापुरी, ता. इंदापुर,जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
या मुलीने रात्री ११.३० ते १२.०० च्या सुमारास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.