पोलीस दलाच्या ताफ्यात ९ वाहने दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:50+5:302021-02-05T05:14:50+5:30
पुणे : शहर पोलीस दलाचे एस्कॉर्ट व पायलट ड्युटी अधिक सक्षमपणे करता यावी, यासाठी प्रजासत्ताक दिनी ९ नवीन कारचा ...

पोलीस दलाच्या ताफ्यात ९ वाहने दाखल
पुणे : शहर पोलीस दलाचे एस्कॉर्ट व पायलट ड्युटी अधिक सक्षमपणे करता यावी, यासाठी प्रजासत्ताक दिनी ९ नवीन कारचा पोलिसांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. तसेच पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पोलीस मनोरंजन केंद्राच्या नूतनीकरणाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिचंवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त बच्चनसिंग, प्रियंका नारनवरे भाग्यश्री नवटाके, स्वप्ना गोरे, पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, आबा चेमटे आदि उपस्थित होते.
पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या कलागुणांना वाव देता यावी व तसेच कुटुंबातील सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता पोलीस दलाच्या स्वतःच्या मालकीचे पोलीस मनोरंजन केंद्र १५ ऑगस्ट १९५९ रोजी सुरू केले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व सध्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केंद्राच्या इमारतीचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण व विस्तारीकरण करून घेत वास्तूच्या बाजूला एक प्रशस्त हॉल तयार करण्याची संकल्पना पूर्णत्वास नेली. ‘सायबेज’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण नथानी व संचालक रितू नथानी यांनी सामाजिक बांधिलकीतून केंद्राचे नूतनीकरणासह विस्तारीकरण केले. तर पालकमंत्री पवार यांनी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी रुपयांचा निधी देऊन ९ वाहने शहर पोलीस दलाला दिली आहेत. प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन कार्यक्रमानंतर केंद्र व वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला.