शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Mumbai Indians vs Chennai Super Kings सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 13:16 IST

18 मोबाईल हँडसेट, ३ लॅपटॉप, १ मॉनिटर, १ सीपीयू, १ राऊटर व रोख ९२ हजार रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे/किरण शिंदे: पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कोंढवा परिसरात कारवाई करत आयपीएल मधील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या नऊ जणांना अटक केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात होता. 

यश प्रताप मनोज कुमार सिंह (वय 22 वर्षे), धर्मेंद्र संगम लाल यादव (वय 25 वर्ष), रिगल चंद्रशेखर पटेल (वय 22 वर्ष), अनुराग फुलचंद यादव (वय 25),  इंद्रजीत गोपाल मुजुमदार (वय 30 वर्ष), सतीश संतोष यादव (वय 19 वर्ष), अजिंक्य शामराव कोळेकर (वय 30 वर्ष),  हेमंत रवींद्र गांधी (38), सचिन सतीश घोडके (वय 45 वर्षे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शाखेच्या पोलिसांना कोंढवा परिसरात आयपीएल मधील क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट तीनच्या पथकाने कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण सोसायटीतील फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी त्यांना चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट मॅचवर आरोपी सट्टा घेताना व पुढे लावताना मिळून आले. 

यावेळी आरोपी लोटस 365 या ऑनलाइन ॲपवर ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी आयडी तयार करून देऊन त्या बदल्यात पैसे ऑनलाईन घेताना मिळून आले. त्यांच्याकडून 18 मोबाईल हँडसेट, तीन लॅपटॉप,  एक मॉनिटर, एक सीपीयू, एक राऊटर व रोख 92 हजार रुपये असा एकूण 512000/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३७१/२०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेIPLआयपीएल २०२३Mumbai Indiansमुंबई इंडियन्सChennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्सPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी