शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या महत्वाकांक्षी 'एचसीएमटीआर' साठी ९ मीटरचा पर्याय? 'निओ मेट्रो' चा विचार केला जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:50 IST

''एचसीएमटीआर'' या ३६ किलोमीटरच्या उन्नत रस्त्यासाठी चढ्या भावाने निविदा आल्यामुळे ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखर्च कमी करण्याचा प्रयत्न : 'निओ मेट्रो'चा होऊ शकतो विचारपुण्याच्या एचसीएमटीआर या उन्नत रस्त्यावर एकूण सहा पदर प्रस्तावित एचसीएमटीआर रस्त्याची लांबी ३६ किमी होती. तर रुंदी २४ मीटर नियोजित

पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी 'एचसीएमटीआर' प्रकल्पासाठी आता ९ मीटरच्या पयार्यावर विचार सुरू असून नाशिक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नियोजित केल्याप्रमाणे 'निओ मेट्रो' चा विचार केला जाण्याची शक्यता आहे. एचसीएमटीआर प्रकल्पाची 'प्रोजेक्ट कॉस्ट' कमी करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.''एचसीएमटीआर'' या ३६ किलोमीटरच्या उन्नत रस्त्यासाठी चढ्या भावाने निविदा आल्यामुळे ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नव्याने प्रकल्प अहवाल (रिव्हाईज्ड प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही एचसीएमटीआर प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प' निओ मेट्रो' असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही शहरांनी वेगवेगळे प्रकल्प करण्यापेक्षा एकसारखे प्रकल्प करण्याची सूचना केली होती.शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांना जोडण्यासाठी १९८७ च्या विकास आराखड्यातील एचसीएमटीआर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.  मात्र, ५ हजार १९२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सुमारे ४५ ते ५० टक्के अधिक दराने निविदा आल्या. या पैकी कमी दराची निविदा ७ हजार ५२५ कोटी रुपयांची होती. ती गावर व लॉगजियान या चीनच्या कंपनीने संयुक्तरित्या भरली होती. तर दुसरी ७ हजार ९६६ कोटी रुपयांची निविदा ही वेलस्पन, अदानी ग्रुप आणि सीसीटीईबीसीएल या चीनच्या कंपनीने संयुक्तरित्या भरली होती.पुण्याच्या एचसीएमटीआर या उन्नत रस्त्यावर एकूण सहा पदर प्रस्तावित होते. यातील दोन पदर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियोजित होते. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रस्तावित एचसीएमटीआर हा निओ मेट्रो अर्थात ट्रामच्या पद्धतीचा होता. हे दोन्ही उन्नत मार्ग एकमेकांच्या अगदी जवळून जात असून पुण्याच्या ३६ आणि पिंपरी-चिंचवडच्या ३१ किलोमीटरच्या दोन्ही मार्गाचा आठचा आकडा तयार होतो. दोन्ही शहरे एकमेकांशी अगदी सलगतेने जोडलेली असल्याने दोन्ही शहरांमधील नागरिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करीत असतात. त्यामुळे हे दोन्ही मार्ग एकसारखेच तयार केल्यास नागरिकांचा फायदा होईल. हे दोन्ही मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे करण्यापेक्षा एकसारखेच करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करणार आहे.---एचसीएमटीआर रस्त्याची लांबी ३६ किमी होती. तर रुंदी २४ मीटर नियोजित करण्यात आली होती. २४ मीटर रुंद रस्त्यावर एकूण ६ पदर नियोजित करण्यात आले होते. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता प्रकल्पाची किंमत कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रकल्प २४ मिटरवरून ९ मीटर करण्याचा विचार सुरू आहे.--------एचसीएमटीआर ९ मीटर केल्यास या रस्त्यावर केवळ दोनच मार्गिका उपलब्ध होऊ शकतील. यासंदर्भात सल्लागार महापालिकेला सादरीकरण करून माहिती देणार होता. परंतु, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे हे सादरीकरण होऊ शकले नव्हते. ते आगामी काही दिवसात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवार