शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आई रागवल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून मारली उडी, हडपसर मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:33 IST

लहान वयातच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुणे : आई रागावल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारी घडली. एवढ्या लहान वयातच किरकोळ कारणावरून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

या घटनेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसरपोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षांचा मुलगा, मावसभाऊ बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आईने मुलीला अभ्यासाला जा, असे सांगितले. या कारणावरून मुलीला राग आला. त्यानंतर मुलीने १३ व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने शाळकरी मुले विचित्र वागू लागले आहेत. किरकोळ कारणावरून जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुलांना सद्यस्थितीत पालक, शिक्षक कोणाचाही धाक नसल्याचे अशा घटनांमधून उघड झाले आहे. अशा परिस्थतीत मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचा सूर समाजात उमटू लागला आहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरStudentविद्यार्थीDeathमृत्यूPoliceपोलिसMobileमोबाइल